सध्या चुकीच्या जीवनपद्धती रूढ झाल्या आहेत. बदलत्या राहणीमानामुळे मुल न होण्याच्या व्याधीमध्ये वाढ होत आहे. 15-20 टक्के रुग्ण या आजाराचे आढळत आहेत. मात्र योग्य उपचारानंतर ही व्याधी कमी होऊ शकते. यासाठी हिंजवडी वाकड रोड येथील कन्सीव आयव्हीएफ या संस्थेने पुढाकार घेतला आहे. युरोपीयन अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून टेस्ट ट्युब बेबी सेंटरची सुरूवात करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते या सेंटरचे रविवारी (दि. 1 डिसेंबर) उद्धाटन होणार असल्याची माहिती संस्थेच्या संस्थापिका डॉ. माधुरी रॉय, चेतन रॉय यांनी पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.मधुमेह, आहारातील चुकीच्या पद्धती, बदलती चुकीची जीवनपद्धती, ताण-तणाव, उच्च रक्तदाब आदीसह अनेक कारणांनी सध्या अनेक जण त्रस्त आहेत. त्यामुळे शारिरिक व्याधींमध्ये देखील वाढ होत आहे. या व्याधींपैकी सध्या मुल न होण्याच्या व्याधीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्या बाबत योग्य जनजागृती झालेली नाही.
देशभरात 15-20 टक्के या आजाराचे प्रमाण आहे. तर पुरूषांमधील (व्यंध्यत्त्व) शारिरिक बदलांचे प्रमाण 30 टक्के आहे. त्यामुळे ही समस्या आढळत आहे. ही समस्या का निर्माण होत आहे, या बाबतही पुरेशा प्रमाणात माहिती दिली जात नाही. या बरोबरच ही समस्या निर्माण झाल्यानंतर योग्य उपचाराची सोय नाही. त्यामुळे अत्याधुनिक यंत्रणा वापरून या समस्या संपविण्यासाठी कन्सीव आयव्हीएफ या संस्थेने पुढाकार घेतला आहे. नुकतेच या सेंटरची सुरूवात करण्यात आली आहे.
दर महिन्याकाठी एका गरजू, गरिब दांम्पत्याला मोफत ही सुविधा देण्याचा मानस या संंस्थेचा आहे. तसेच संस्थेच्या संस्थापिका डॉ. माधुरी रॉय या देखील लोकांमध्ये जाऊन या बाबत जनजागृतीचे काम करत आहेत. शहरातील विविध कंपन्या, शाळा, महाविद्यालय, संस्थांमध्ये आरोग्य कॅप करत आहेत. त्याद्वारे मुल होत नसल्याची कारणे, त्यावरील उपाय व उपचाराची मोफत माहिती दिली जात आहे.
हे सेंटर सुरू करण्यापुर्वी सामाजिक बांधिलकी जपत 2007 पासून विविध उपक्रम राबविले. शैक्षणिक, मोफत आरोग्य शिबिर, स्त्री सशक्तीकरण प्रकल्प केले आहे. ओमान या देशात असताना त्यांनी औषधोपचाराचे देखील मोफत वाटप केले आहे. भारत, श्रीलंका, बांगलादेशी नागरिकांसाठी हे उपक्रम राबविले आहेत. हीच सामाजिक बांधिलकी जपत या सेंटरची सुरूवात केली आहे. या सेंटरचे पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते रविवारी 1 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती डॉ. माधुरी रॉय यांनी दिली.