वाकड येथील कन्सीव आयव्हीएफ सेंटरचे नुकतंच मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. पवन साळवे, नगरसचिव उल्हास जगताप, ग्लोबल मेडिकल सर्व्हिसेसचे व्हाईस प्रेसिडेंट डाॅ. अनिल बनकर, मॅनेंजिंग डायरेक्टर डॉ. माधुरी रॉय आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस इंडस इंटरनॅशनल स्कूलच्या रेवा रॉय यांनी भरत नाट्यम नृत्य सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ. साळवे यांनी कन्सीव आयव्हीएफ सेंटरच्या डिजीटल व्हीडिओचे उद्धाटन केले. सेंटरतर्फे दिल्या जाणार्या सुविधा, जनजागृतीबाबत माहिती देण्यात आली. पालकत्वाची स्वप्नं आणि वस्तूस्थिती यावर माहिती देण्यात आली. युरोपीयन तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातील नागरिकांना या सेंटरमार्फत विविध सुविधा देखील या व्हिडीओमध्ये माहिती देण्यात आली आहे.
तसेच जास्तीत-जास्त लोकांपर्यंत जनजागृती व्हावी, याकरिता सेंटरकडून संकेतस्थळ सुरू केले आहे. पालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप आणि डॉ. अनिल बनकर यांच्या हस्ते www.conceiveindiaivf.com संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. या सेंटरच्या मॅनेंजिंग डायरेक्टर डॉ. माधुरी रॉय यांनी संस्थेच्या यशामध्ये वाटा असणार्या सर्वांचे आभार व्यक्त केले. तर या दर्जेदार युरोपीयन तंत्रज्ञान वापरून त्याचा भारतातील नागरिकांना लाभ व्हावा, या उद्देशाने हे सेंटर सुरू केले आहे, असे डॉ. रॉय यांनी सांगितले.
डॉ. पवन साळवे म्हणाले की, या सेंटरमुळे ज्यांना मुलं हवे आहेत, अशा पालकांना त्याचा निश्चित लाभ होणार आहे. लग्न झालेल्या दांम्पत्यामध्ये मुल न होणे, ही समस्या मोठी बनली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये नैराश्य पसरत आहे. डॉ. रॉय यांनी हे सेंटर सुरू केल्यामुळे त्याचा सर्वसामान्यांनाही लाभ होईल, हे सेंटर तालुका व जिल्हा स्तरावर सुरू करावे, असे त्यांनी म्हटले आहे.